राजापूर तालुक्यातील सागवे जिल्हापरिषद गटामध्ये आमदार डॉ.राजन साळवी यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे ‘होऊ द्या चर्चा’ या कार्यक्रमाचे आयोजन

राजापूर(प्रतिनिधी )दि.०३: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे सध्या राजापूर विधानसभेमध्ये ‘होऊ द्या चर्चा’ या कार्यक्रमाचे आयोजन ठिकठिकाणी करण्यात आले आहे. त्यानुसार राजापूर तालुका शिवसेनेतर्फेही ‘होऊ द्या चर्चा’हा कार्यक्रम आज मंगळवार, सकाळी ११ वा. सागवे येथे शिवसेना उपनेते आमदार राजन साळवी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला असून त्यावेळी आमदार डॉ.राजन साळवी यांनी सर्वांशी चर्चा करून सर्वांना मार्गदर्शन केले.
केंद्र सरकारने गेल्या नऊ वर्षामध्ये अनेक आश्वासने दिलीत. शिवस्मारक समुद्रात बांधणे, दाऊदला अटक करणे, गंगा स्वच्छ करणे, स्मार्टसिटी, कश्मिरी पंडितांना माघारी आणणे, आरक्षण, शेतकऱ्यांना हमीभाव या आश्वासनांचे काय झाले? दाऊदला अटक करणं, गंगा स्वच्छ करण, स्माटसटा, काश्मरी पंडितांना माघारी आणण, मराठा, धनगर आरक्षण, शेतकऱ्यांना हमीभाव या आश्वासनांचे काय नरेंद्र मोदी यांनी तर पंतप्रधान होण्यापूर्वी दरवर्षी देशात दोन करोड नोकऱ्या निर्माण करण्याचे व प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. पण, ही सर्व आश्वासने हवेतच विरली आहेत. राज्य सरकारच्या बाबतीतही तीच परिस्थिती आहे. या असंख्य प्रश्नांना वाचा फोडण्यासाठीच ‘होऊ द्या चर्चा’चे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमामध्ये देश, राज्यभरातील विविध समस्या, सरकारचे अपयश याविषयी चर्चा असून संघटनात्मक बांधणीबाबतही चर्चा झाली.
यावेळी विधानसभा समनव्यक प्रकाश कुवळेकर, तालुका प्रमुख कमलाकर कदम,महिला तालुका संघटक प्राची शिर्के,उपतालुका प्रमुख रामचंद्र उर्फ तात्या सरवणकर, विभाग प्रमुख नंदकिशोर मिरगुले, नरेश दूधवडकर,अर्बन बँक संचालक शशिकांत सुतार,उपविभाग प्रमुख अनिल नानारकर,विनोद पेडणेकर, सरपंच सोनाली ठुकरुळ,जुनेद मुल्ला काँग्रेस ,महिला आघाडी शैलजा मांजरेकर,शीतल पंगरेकर, युवासेना प्रसाद मांजरेकर,उपसरपंच मंगेश गुरव, इतर सर्व सरपंच ,उपसरपंच, सदस्य पदाधिकारी आजी माजी शिवसैनिक उपस्थित होते.