मुंबई । आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या आधी काँग्रेस पक्षाकडून वाढीव पेट्रोलदर वाढीविरोधात आंदोलन करण्यात आले. कोरोना काळात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरामुळे सामान्य नागरिक अगदी त्रासले होते.
या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस पक्षाने अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सायकल घेवून आंदोलन केले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानभवनात येताना यांनी सायकल रॅली काढण्यात आली होती. यावेळी कॉंग्रेस पक्षाचे सर्व आमदार या रॅलीत सहभागी झाले होते.
आगळ्यावेगळ्या पद्धतीने ही सायकल रॅली काढत केंद्र सरकारचा काँग्रेसने निषेध केला.यावेळी प्रतिक्रिया देत भाई जगताप यांनी केंद्र सरकारवर संताप व्यक्त केला.