यवतमाळ जिह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या २४ तासात कोरोनाने २३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे यवतमाळमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंतची हि सर्वाधिक मृत्युसंख्या आहे. २४ तासात चार हजार २२३ जणांची कोरोना चाचणी ककरण्यात आली. त्यापैकी तीन हजार २७९ नमुने निगेटिव्ह तर ९५३ नमुने पॉझिटिव्ह आले आहे.
जिल्ह्यातील ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तीन हजार ७८६ झाली आहे. शासकीय व खासगी कोविड रुग्णालयात दोन हजार ५१ रुग्ण दाखल आहे. तर १ हजार ७३५ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. पहिल्यांदाच गृहविलगीकरणातील रुग्णांपेक्षा रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या वाढली आहे.