अमरावती – अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वेत सकाळच्या ११ वाजण्याच्या दरम्यान आगीचा भीषण तांडव पाहायला मिळाला. धामणगाव रेल्वेतील प्रदीप रोघें यांच्या कोठारी नगर घरालगत असलेल्या गोठ्याला आग लागल्याने परिसरात भीतीच वातावरण निर्माण झालं होतं.
आग इतकी भीषण होती की यात गोठ्यातील संपूर्ण लाकडं व इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक झाल्या आहेत. अग्निशामक बंब वेळेवर पोहचल्याने दाट वस्ती असलेलं कोठारी नगर येथील आग आटोक्यात आली.
आगीत कुठलीही जीवीत हानी झाली नाही. मात्र आगीने भीषण अवतार घेतल्याने काही काळ परिसरातील नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं होतं. ही आग कशामुळे लागली याचा शोध सद्या घेतला जातो आहे.