महाराष्ट्र : होम डिलिव्हरी देणाऱ्या शेकडो कंपन्यांचे लक्षावधी डिलिव्हरी बॉईज अशा अनेकांचे आधार असलेले सर्वात जास्त वापरले जाणारे गुगल मॅप्स हे टूल सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले असून यावेळी महाराष्ट्रातील अनेक गावे गुजरात राज्यात दाखवण्यात आल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
प्रकरण असे की, गुजरात आणि महाराष्ट्राची सीमा उत्तरेकडे अगदी लागून आहे आणि गुजरातमधील उंबरगाव आणि वेवजी या गावांत सातत्याने सीमेवरुन वाद होत असतो. महाराष्ट्राच्या तलासरी तालुक्यातील वेवजी गाव उंबरगावच्या पंचायतीने गुजरातमध्ये दाखवल्याचे अनेकदा दिसून आले होते. आता गुगल मॅप्सवरही तसेच दिसत असल्याने उंबरगाव प्रशासनाविरोधात वेवजी ग्रामस्थ असा संघर्ष पुन्हा निर्माण होत आहे.
वेवजी गाव असा मर्यादित वाद असताना आता गुगल मॅप्सवर महाराष्ट्रातील वेवजी गावासह इंडिया कॉलनी, मेहेरणोसची बोमन इंग्लिश स्कूलसह बराच मोठा परिसर गुजरात राज्यात दाखवल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. यामागे नक्की कोणाचा हात आहे, याची चौकशी करण्याची मागणी वेवजी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
गुगल मॅप्समध्ये फोटो, व्हिडीओज अपलोड करणे, रिव्ह्युज लिहिणे आणि नकाशातील काही चुका असतील तर त्या दुरुस्त करणे अशा विविध हेतूंनी ‘लोकल गाईड्स’ जगभर काम करत असतात. त्यांच्या प्रत्येक अपलोड, दुरुस्ती, प्रश्नोत्तरे यासाठी मॅप्सकडून पॉईंट्सही दिले जातात. मात्र, हे सगळे समाजोपयोगी दृष्टीकोनातून चालते. शिवाय मॅप्समधील एखाद्या ‘लोकल गाईड’ने सुचवलेली दुरुस्ती गुगलकडून खात्री केल्यानंतरच अंमलात आणली जाते मात्र हे समाजविघातकाने केले आहेत का या बद्दल श्नक उपस्थित केली जात आहे.