लातूर- राज्यात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे.अश्यात राज्यात रक्ताचा आणि ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागला आहे.यावर प्रशासनाला लवकरात लवकर उपाययोजना आखाव्या लागतील अन्यथा येणारा काळ हा कठीण जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सध्या राज्यभरात कोविड पेशंट मोठया प्रमाणात वाढत असून बहुतांश रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. सध्या लातूर शहरात ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या दोनच कंपन्या असून त्या लातूर बरोबरच उस्मानाबाद, बीड जिल्ह्यातील दवाखान्यात देखील ऑक्सिजन पुरवठा करतात. मात्र सद्य स्थितीत मागणी वाढत असून येणाऱ्या काळात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
ऑक्सिजन पुरवठा हा रुग्णालयात करण्यासाठी मागील वर्षी व्यावसायिक तत्त्वावर विकला जाणार ऑक्सिजन सिलेंडर बंद करण्यात आला होता.मात्र,व्यापरिक अडचण सोडवण्यासाठी हा निर्णय मागे घेण्यात आला.आता यावर प्रशासन पुन्हा काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.