भारत संघाचा क्रिकेटपटू हार्दीक पांड्या व कृणाल पांड्या यांच्या एका डान्स व्हिडीओने सोशल मिडीयावर धुमाकूळ घातला आहे. यात दोघेजण आपल्या पत्नी समवेत डान्स करताना दिसत आहेत. यात दोघा भावांनी एकाच कलरचे टी- शर्ट घातले आहे. हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरत असून यावर कमेंटचा वर्षाव होत आहे. अनेकांनी हा व्हिडिओ शेअर देखील केला आहे.
हॉटेलच्या गार्डनमध्ये दोन भावांनी व दोन्ही जावा-जावांनी एका गाण्यावर ताल धरला आहे. हार्दिक पांड्या त्याच्या खेळण्याच्या हटके अंदाजाने कायम चर्चेत असतो. तसेच त्याची पत्नी हिंदी चित्रपटात देखील दिसली आहे. काही दिवसांपूर्वी कृणाल पांड्या आपल्या वडिलांच्या आठवणीने सामना दरम्यान भावूक झाल्याचे पाहायला मिळाले होते.मात्र, आता पुन्हा संपूर्ण फॅमिली हि आपल्या डान्समुळे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.