इगतपुरी हे मध्यरेल्वेचे महत्वाचे घाटमाथ्यावर वसलेले स्टेशन जेव्हा भारतात रेल्वे सुरू झाली त्यावेळी घाटात कोणताही अपघात झाला तर जवळ हॉस्पिटल हवे ह्या उद्देशाने इगतपुरी येथे भव्य रेल्वे हॉस्पिटल बांधण्यात आले, कल्याण नंतर इगतपुरी व भुसावळ येथेच एवढे मोठे रेल्वेचे हॉस्पिटल होते. १९९0 च्य दशकात येथे मोठमोठ्या शस्त्रक्रिया होत होत्या भुसावळ, कसारा, नाशिक आदी ठिकाणाहून येथे रुग्ण उपचारासाठी येत होते. घाटात जर काही मोठा अपघात घडला तर रुग्णांस त्वरित उपचार मिळावे हा व रुग्णाचा जीव वाचवा हा हेतू होता. येथे या अत्याधुनिक मशिनरी, दक्षता वार्ड, अतिदक्षता वार्ड, जनरल वार्ड व साथीच्या रोगांसाठी वेगळा वार्ड होता, व १६० बेड आणि सर्व सोयींनी युक्त असे हे हॉस्पिटल होते मात्र १९९५ हळू हळू येथील नंतर येथील स्टाफ कमीकमी होत गेला. आता परिस्थिती अशी आहे की घाटात जर मोठा अपघात झाला तर रुग्णांस नाशिक किंवा कल्याण येथे हलवावे लागते कारण इगतपुरी तालुक्यात एकही मोठे हॉस्पिटल नाही व नाशिक किंवा कल्याणला नेताना रुग्ण दगावू शकतो. गेल्या अनेक वर्षापासून इगतपुरी करांची ही मागणी आहे की रेल्वे हॉस्पिटल परत पूर्ववत सुरू करावे. आज आर पी आयचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय रामदास आठवले इगतपुरी येथे आले असता इगतपुरीकरांनी रेल्वे हॉस्पिटल परत पूर्ववत सुरू करण्यास व तेथे अद्यावत सुविधा उबलब्ध करून देऊन कोरोना रुग्णांसाठी पण तेथे उपचार चालू करण्याचे रामदास आठवले यांना साकडे घातले आठवले यांनी तात्काळ मुंबईचे डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर यांना फोन लावून हॉस्पिटल पूर्ववत सुरू करण्यास काय करता येईल यासंदर्भात चर्चा केली व रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याशी चर्चा करून इगतपुरी रेल्वे हॉस्पिटलचा प्रश्न लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.