देशात दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. रुग्णांचे आतोनात हाल होत आहेत. कोणाला बेड मिळत नाहीय तर कोणाला अॅाक्सिजन मिळत नाहीय. कोरोनामुळे लोकांचे जीव जात आहेत. मात्र कोरोनापेक्षा भयंकर लागलेली कीड म्हणजे राजकारण अशा शब्दात अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने एक पोस्ट केली आहे.आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीतून शेअर केलेल्या पोस्टमध्ये ती म्हणते, “सगळ्यात मोठी “कीड” जर आपल्या देशाला, आपल्याच नाही, तर सगळ्या जगाला लागली आहे, ती आहे “राजकारण”…ही “कीड” कोविडपेक्षा भयाण, घातक आणि वर्षानुवर्षे आपल्याला पोखरत जाणारी आहे. या “कीड”पासून बचाव करता आला तर बघा! ..अवघड आहे सगळंच…काळजी घ्या.”
तेजस्विनी पंडीत ही मराठी अभिनेत्रीपैकी टाॅप अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तेजस्विनीने आपला संताप या माध्यमातून व्यक्त केला आहे. यापूर्वीही काही कलाकारांनी आपली मतं व्यक्त केली आहेत. तिच्या या पोस्टला अनेक कलाकारांनी व चाहत्यांनी सपोर्ट केल्याचे पाहायला मिळत आहे.