हरिद्वार। हरिद्वार येथे होणाऱ्या कुंभमेळ्याची तयारी सुरू झाली असून केंद्रीय आरोग्याचा आढावा घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या आढाव्यानंतर कुंभमेळा काळात करोनाचा उद्रेक होण्याचा इशारा दिला आहे.
करोनाची दुसरी लाट आलेली असल्याने कुंभमेळा होत असल्याने केंद्र सरकार सतर्क झाले आहे. केंद्रीय पथकाने हरिद्वार येथे होत असलेल्या कुंभमेळ्यात येणाऱ्या लोकांसाठी करण्यात येत असलेल्या आरोग्य सुविधांची पाहणी केल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने उत्तराखंडच्या सचिवांना पत्र पाठवून खबरदारी घेण्याचा इशारा दिला आहे.
करोनाबाधित आढळून येत असल्याने रुग्ण वाढण्याची भीती जास्त आहे. कुंभमेळ्यासाठी १२ राज्यांतून भाविक हरिद्वारमध्ये होत असलेल्या कुंभमेळ्याला येऊ शकतात. तर दुसरीकडे कुंभमेळा जवळ येत असतानाच दररोज १० ते १२ स्थानिक नागरिक आणि तितकेच भाविक करोनाबाधित आढळून येत असल्याचे केंद्रीय पथकाने नमूद केले आहे.
करोनाबाधित आढळून येत असल्याने पॉझिटिव्ही रेट वाढण्याची भीती आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात भाविक येणार असल्यामुळे दिवसाला 50 हजार रॅपिड अँटिजेन टेस्ट आणि पाच हजार आरटीपीसीआर चाचण्या पुरेशा नाहीत.