पुणे । काल रात्री पुण्यात लागलेल्या फॅशन मार्केटच्या सकाळी आढावा घेऊन कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अग्निशमन दलाचे अधीक्षक प्रकाश हसबे घरी जात असताना त्यांचे आज दुर्देवी अपघाताने निधन झाले. फॅशन मार्केटच्या लागलेल्या आगीचा सकाळी आढावा घेऊन हसबे हे घरी निघाले होते. कर्मचाऱ्यांना दोन तासात पुन्हा कामावर परत येतो असे सांगून ते कॅम्प येथून निघाले. येरवडा मार्गावरून जात असताना रस्त्यात त्यांचा अपघात होऊन मृत्यू झाला, अशी माहिती कर्मचारी यांच्याकडून मिळत आहे.
दरम्यान, कॅम्प मधील फॅशन स्ट्रीट भागात शुक्रवारी रात्री आगीने तांडव घातले. या ठिकाणी असलेल्या दुकानांना रात्री ११च्या सुमारास भीषण आग लागली. आगीची तीव्रता ही प्रचंड होती त्यामुळे तेथील जवळपास ८०० दुकानं जळून खाक झाली आहेत.