राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात सकाळी दाखल करण्यात आलंय. त्यांच्या पोटात दुखल्यामुळे थोडासा अस्वस्थपणा जाणवत होता, म्हणूनच तपासणीसाठी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आले. निदान झाल्यानंतर, त्यांच्या पित्ताशयामध्ये एक समस्या असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिली.
तर, दुसरीकडे त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही व्हॉट्सअप स्टेटसद्वारे वडिल शरद पवार यांचे पुढील १५ दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे सांगितले. त्यानंतर, शरद पवार लवकर बरे होण्यासाठी संपूर्ण देशभरातून प्रार्थना करण्यात येत आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , मनसे अध्यक्ष राज ठाकरे, लता मंगेशकर यांनी ट्विट करून विचारपूस केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सदिच्छा या महाराष्ट्राच्या प्रातिनिधिक भावना आहेत, त्यांचे मनपूर्वक आभार! असे पवार यांनी म्हटले. तसेच, भारतरत्न लता मंगेशकर, आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनीही शरद पवार यांना फोन करुन त्यांची आस्थेनं विचारपूस केली.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही शरद पवार यांच्या प्रकृतीची आस्थेनं विचारपूस केली. याबाबत, स्वत: शरद पवार यांनी ट्विटरवरुन माहिती दिली. तसेच, राज यांच्यासह सर्वांचे मनापासून आभार मानले आहेत. आपल्या सर्वांच्या सदिच्छा माझ्यासोबत आहेत, असेही पवार यांनी म्हटलं.
माझ्या प्रकृती अस्वास्थ्याची बातमी कळताच आदरणीय लता मंगेशकर दिदींनी माझ्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून माझ्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. लता दिदींसारख्या सुहृदय व्यक्तींच्या सदिच्छा माझ्या सोबत आहेत. त्यांचा मी मनपूर्वक आभारी आहे.@mangeshkarlata
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 29, 2021