सध्या संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले आहे त्यामुळे प्रत्येकजण आपल्या जीव सांभाळत आहे. मात्र आता कोरोनासारख्या विषाणूला न घाबरता व कसलाही विचार न करता हा घरच्या घरी काढा बनवा आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवा.
आयुर्वेदिक काढ्याच्या मदतीने आपण नैसर्गिक पद्धतीने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकतात.
काढा बनवण्यासाठी लागणार साहित्य
तुळशीचे पाने
-दालचिनी
-सुंठ
-काळे मिरे
हे सर्व एकत्र वाटून त्याची पावडर बनवा. त्याच्यापासून ४ ग्रॅमची टी-बॅग किंवा ५०० मिलिग्रॅम पावडरच्या गोळ्या तयार करा. दिवसातून एक किंवा दोन वेळा याला १५० मिलीलिटर उकळलेल्या पाण्यात घालून चहासारखं प्या. याचा फायदा आपल्या आरोग्यासाठी नक्की होईल. ताप किंवा सर्दी असेल तर तुम्ही हा काढा दिवसातून चार वेळा घेऊ शकतात.
जर तुम्ही रक्तदाबाचे रुग्ण असाल तर, डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कधीही काढा पिऊ नये. यामुळे नाकातून रक्तस्त्राव होऊ शकतो आणि आपण मोठ्या समस्येत अडकू शकाल. काढ्यात मसाल्याच्या पदार्थांचा समावेश असतो. अनेकजण डॉक्टरांचा सल्ला न घेता इंटरनेटवर पाहून घरी काढा तयार करत आहेत. पण त्यामुळे अनेक आरोग्यविषयक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. काळी मिरी दालचीनीच्या अतिसेवनाने पोटदुखीची समस्या निर्माण होऊ शकते.गुळवेळ, अश्वगंधा यांसारख्या औषधीं वनस्पतींच्या ओव्हरडोसमुळे शारीरिक समस्या उद्भवतात.