मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी सौ रश्मी उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. रश्मी ठाकरे या सध्या कोरोना झाल्यामुळे मुंबईच्या एच.एन. रिलायन्स रुग्णालयात उपचार घेत आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून रश्मी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. या संदर्भातील माहिती आता समोर आलेली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रश्मी ठाकरे यांना केलेल्या फोनमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
रश्मी ठाकरे यांना २३ मार्च रोजी कोरोनाची लागण झाली होती त्यापाठोपाठ मंत्री आदित्य ठाकरे यांना सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले होते. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरच त्यांनी स्वत: क्वारंटाईन करुन घेतलं आहे. त्यानंतर रश्मी ठाकरे यांना दोन दिवसांपूर्वी एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. महत्वाची बाब म्हणजे ११ मार्च रोजी रश्मी ठाकरे यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता.