ढाका : पंत्रप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या बांगलादेश दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. यादरम्यान, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी पंतप्रधान मोदी हे विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. या देशासोबत भारताचे दृढ संबंध आहेत. यामुळे या दौऱ्याबाबत आनंदी आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हंटले होते.
नरेंद्र मोदी यांचे विमान सकाळी साडे दहा वाजता ढाकामधील हजरत शाह जलाल इंटरनॅशनल एरपोर्टवर लॅन्ड होईल असे सांगण्यात आले होते. तेव्हा बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना स्वत: पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी तिथे उपस्थित राहतील. मात्र आता पंतप्रधान मोदी यांना ढाका येथे त्यांच्या दौऱ्याला काही संघटनांकडून विरोध करण्यात आला आहे.
मोदी यांच्या दौऱ्याविरोधात आंदोलन विविध डाव्या-पुरोगामी विद्यार्थी संघटनांचा सहभाग असलेल्या ‘प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स अलायन्स’च्यावतीने आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी सरकारचा पाठिंबा असलेल्या विद्यार्थी संघटनांना या आंदोलकांवर हल्ला केला होता. आता समोर आलेल्या माहितीनुसार सत्ताधारी पक्षाची विद्यार्थी संघटना असलेल्या बांगलादेश छात्र लीगच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आंदोलकांवर हल्ला करण्यात आला अशी माहिती समोर येत आहे.