काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पात्रावर आधारित असलेल्या जाहिरातीमध्ये खिल्ली उडवल्याप्रकरणी मुंबईतील स्टोरिया फूड कंपनी कार्यालयासमोर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करत कंपनीयाच्या या जाहिरातीचा निषेध नोंदवला होता. मात्र कोरोना संकटामुळे राज्यात कलम १४४ लागू करण्यात आला असताना त्याचाही विचार न करता कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मंगळवारी स्टोरिया फूड्सविरोधात मोर्चा उघडला.
या सर्व प्रकरणात पोलिसांनी कोरोना संकटात कलम 144 चं उल्लंघन केल्याप्रकरणी 8 जणांना अटक केली. या संदर्भात आंदोलन करणारे काँग्रेस कार्यकर्ते म्हणाले की, स्टोरिया फूड्सने कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची नुकत्याच एका जाहिरातीत खिल्ली उडविली. त्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुंबईतील स्टोरिया फूड्स कार्यालयासमोर निषेध केलाय. त्यांच्या निषेधावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली.
या संदर्भात मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी ट्विट करून आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आभार मानले आहे. “आदरणीय सोनियाजी गांधी व आदरणीय राहुलजी गांधी यांची STORIA कंपनीने जाहिरातीमधून केलेल्या बदनामीला चोख उत्तर दिल्याबद्दल मुंबई काँग्रेस सरचिटणीस नितीन सावंत तसेच युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन व कौतुक !! असले घाणेरडे धंदे खपवून घेतले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी!!” असे ट्विट त्यांनी केले आहे.
आदरणीय सोनियाजी गांधी व आदरणीय राहुलजी गांधी यांची STORIA कंपनीने जाहिराती मधून केलेल्या बदनामीला चोख उत्तर दिल्याबद्दल मुंबई काँग्रेस सरचिटणीस नितीन सावंत तसेच युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन व कौतुक !!
असले घाणेरडे धंदे खपवून घेतले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी!! ☝️ pic.twitter.com/e68iUXwrZG
— Bhai Jagtap – भाई जगताप (@BhaiJagtap1) April 27, 2021