सौदी अरेबिया । भारतीय संस्कृतीमध्ये रामायण महाभारत आणि बौद्ध ग्रंथ या ग्रंथांना मानाचे स्थान दिले जाते. मात्र आता यात भर म्हणून धार्मिक ग्रंथांची शिकवण साता समुद्रापार दिली जाणार आहे. इस्लाम धर्माचे कट्टर पालन करणारा सौदी अरेबिया या देशात आता रामायण, महाभारतातील धडे शिकविले जाणार आहे.
इतर देशांची संस्कृती व त्यांचा इतिहास जाणून घेणे हे महत्वाचे आहे. त्यामुळे सौदी अरेबिया देशाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी व्हिजन २०३० अंतर्गत सौदी अरेबियाच्या शिक्षण क्षेत्रात काही बदल करण्यात आले आहेत.
सर्व देशांच्या संस्कृती बद्दलचा अभ्यासक्रम पाठ्यपुस्तकांतून दिला जाणार असून, विशेषतः भारतीय संस्कृती व आयुर्वेद शास्त्र याचा समावेश असणार आहे. त्याचबरोबर काळानुसार पुढे जाणे महत्वाचे आहे असे सांगत प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी इंग्रजी भाषेचा समावेश केलेला आहे.
प्रिन्स मोहम्मद बिन सलमान हे स्वतः एक अर्थतज्ञ असून त्यांच्या मते, जर इतर देशांच्या संस्कृतीची देवाण-घेवाण झाली तर येणाऱ्या पुढच्या पिढिमध्ये मानवतेचे बीज रोवले जाईल. तसेच परस्पर देशांमध्ये मैत्रीची भावना प्रस्थापित होऊन जगातील दहशतवाद संपुष्टात आणण्याच्या दृष्टिकोनातून उचलले हे महत्वपूर्ण पाऊल आहे. असे त्यांनी सांगितले.
तसेच सौदी अरेबिया मधील एका नागरिकाने आपल्या पाल्याची प्रश्नपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
Saudi Arabia’s new #vision2030 & curriculum will help to create coexistent,moderate & tolerant generation. Screenshots of my sons school exam today in Social Studies included concepts & history of Hinduism,Buddhism,Ramayana, Karma, Mahabharata &Dharma. I enjoyed helping him study pic.twitter.com/w9c8WYstt9
— Nouf Almarwaai نوف المروعي ???????? (@NoufMarwaai) April 15, 2021
दरम्यान, भारतीय संस्कृतीतील बौद्ध ग्रंथ ,रामायण महाभारत हे मानाचे समजले जाणारे ग्रंथ आता सातासमुद्रापार त्याची ख्याती पसरली आहे हे भारतासाठी व देशातील नागरिकांसाठी अभिमानास्पद बाब आहे.
भारतात दूरचित्रवाणीचा उदय झाला तेव्हा प्रारंभीच्या काळात मनोरंजच्या दृष्टिकोनातून करण्यात आलेल्या रामायण, महाभारत या पौराणिक मालिका आजही लोकांना तितक्याच भुरळ घालतात.
याचपार्श्वभूमीवर अभिनेता सुनील लहिरी याने रामायण मालिकेतील फोटो इन्स्टाग्राम ला पोस्ट करत रामायण महाभारतातील शिकवण सातासमुद्रापार पोहोचत असल्याचा सार्थ अभिमान असे त्याने सांगितले.