२०२० मध्ये जाहीर झालेला ग्लोबल टीचर पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या रणजितसिंह डीस्ले यांच्या नावाने आता इटली मधील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. शिक्षणाचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा या हेतूने ग्लोबल टीचर पुरस्कारादरम्यान अंतिम फेरीतील नऊ शिक्षकांना मिळालेल्या रकमेतील साडे तीन कोटी रक्कम देण्याचे रणजितसिंह डीस्ले यांनी जाहीर केले होते,व ठरल्याप्रमाणे ते देण्यातही आहे. याचदरम्यान अंतिम फेरीतील इटली येथील शिक्षक कार्लो मझोने यांनाही रक्कम देण्यात आली.
रणजितसिंह डीस्ले यांची शिक्षणाविषयीची आस्था लक्ष्यात घेत इटली सरकारने गुणवंत विद्यर्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी रणजितसिंह डीस्ले यांच्या नावे इटलीतील सॅमनिटे विद्यापीठाकडून देण्यात येणार आहे. शिक्षणापासून वंचित असलेल्या व मेहनती मुलांना शिक्षणचा लाभ मिळावा म्हणून इटलीतील विद्यापीठाकडून४०० युरो ची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
इटलीच्या या महत्वपूर्ण निर्णयानंतर रणजितसिंह डीस्लेप्रतिक्रिया दिली आहे. शिक्षणाचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा व जगभरातील विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती व शिक्षण पद्धती विषयी माहिती मिळावी तसेच भविष्यात शिक्षण पद्धतीमध्ये महत्वपूर्ण योगदान देतील अशी आशा आहे. असे त्यांनी संगितले.