नवी दिल्ली : १४ एप्रिल अर्थात डॉ बाबासाहेब आंबेडक जयंतीला केंद्र सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे यापुढे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवशी सर्व केंद्रीय कार्यालयांचे कामकाज संपूर्ण बंद राहणार आहे. अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे.
केंद्र सरकारने या संदर्भात घेतलेल्या निर्णयासंबंधी सर्व मंत्रालयांना एक जीआर जारी केला आहे. यामध्ये आपापल्या विभागाला यासंदर्भात माहिती देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक संघटनाची असलेली मागणी अखेर केंद्र सरकारने मंजूर केली आहे. केंद्र सरकारच्या या घोषणेमुळे डॉ बाबासाहेबी आंबेडकर अनुयायांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.