राज्यातील कोरोना आकडेवारी कमालीची वाढत जात असून परिस्थिती भयावह होत आहे.दिवसेंदिवस वाढत चाललेले रुग्ण आणि अपुऱ्या वैद्यकीय सेवांमुळे तसेच दिलेल्या नियमांचे नागरिकांकडून पालन होत नसल्याने परिस्थिती हाताबाहेर जात आहे.
त्यामुळे आता पुणे महानगरपालिकेने संबंधित परिस्थिती लष्कराची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यासंदर्भात लष्कराला मदतीचे निवेदन देण्यात आले असून अद्याप यावर लष्कराने कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही आहे.
दरम्यान राज्यातील महत्वाची शहरे म्हणून ओळखले जाणारे मुंबई, पुणे, नाशिक व अन्य शहरात कोरोनाचा उद्रेक झपाट्याने होत असून सरकारी व खाजगी रुग्णालयातील बेड , आयसीयू आणि व्हेटिलेटरच्या सोयी अपुऱ्या पडत असून रुग्णसंख्या वाढतच आहे.
त्यामुळे आता पुणे महानगरपालिकेच्या या निवेदनास लष्कर काय उत्तर देणार आहे हे पाहणं महत्वाचे आहे.