सध्या आयपीएलचा भारतात धुमधडका चालू आहे. प्रत्येक संघ आपल्या विजयासाठी चिकाटीने प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे सामान्यासोबतच खेळाडू आपल्या फॅमिलीसोबत सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. काही खेळाडू आपल्या मुलांसोबतचे फोटो, व्हिडीओ शेअर करत आहेत. काही संपूर्ण फॅमिलीसोबत तर काही आपल्या पत्नीसोबत व्हिडिओ करत आहेत. अशातच रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरुचा फिरकीपटू युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.धनश्री वर्मा ही डान्सर असल्याने तिचे हजारो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र या व्हिडीओत ती भांगडा डान्स करताना दिसत आहे. व तिने चाहत्यांची मनं जिंकून घेतला आहे.
धनश्री वर्मा अक्षय कुमार आणि करीना कपूरच्या सौदा खरा खरा या गाण्यावर डान्स करत आहे. लाल टी शर्ट आणि काळ्या रंगाची पँन्ट तिने परिधान केलीय. या कलर कॉम्बिनेशनमध्ये ती कमालीची सुंदर आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओला भरभरून प्रेम दिल आहे. काही दिवसांपूर्वी हार्दिक पांड्या व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला होता व तो प्रचंड व्हायरल झाला होता.