पुणे । पूजा चव्हाण आत्महत्येनंतर राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. त्यामुळे विरोधकांकडून पुणे पोलिसांच्या तपासावर सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण करत जात आहेत. असं असूनही पुणे पोलिसांना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी गांभीर्य आहे कि नाही असा प्रश्न उपस्थित करणारा प्रकार समोर आला. पत्रकार परिषदेत पूजा चव्हाण प्रकरणावर प्रश्न विचारताच पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता हसले आणि उत्तर न देताच निघूनही गेले. या घडल्या प्रकाराची चर्चा आता सर्वत्र होत आहे.
पुण्यात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकारांनी गुप्ता यांना पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी शिवसेनेचे नेते व नुकताच आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिलेले संजय राठोड यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, पूजाच्या शव विच्छेदन अहवालात नेमके काय आले याबाबत प्रश्न विचारण्यात आला. पत्रकाराकडे दुर्लक्ष करत माहिती न देता गुप्ता आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून निघून गेले.