मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना देखील करोनाची लागण झाली आहे. अमित ठाकरे यांनी काही दिवसांपासून कोरोनाची लक्षणं जाणवत होती. त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. अमित यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घरातील इतर सदस्यांना संसर्ग होऊ नये म्हणून त्यांनी ही खबरदारी घेतली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत जात आहे. काही दिवसांपुर्वी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे व मुलगा आदित्य ठाकरे या दोघांना कोरोनाची लागण झाली होती व आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे.