मुंबई। बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खान याचा कोरोना रिपोर्ट बुधवारी पॉझिटीव्ह आला आहे. याची माहिती आमिर खानच्या टीमनेमाध्यमांशी बोलताना दिली होती. आमिरला कोरोना झाल्याचे कळताच चाहत्यांना धक्का बसला. पण सर्वाधिक धक्का कोणाला बसला असेल तर तो बिग बॉसमध्ये झळकलेली म्हणजे ड्रामा क्वीन राखी सावंतला. आमिरला कोरोना झाल्याचे कळताच तिच्या प्रतिक्रिया बघून युजर्सनी ‘नौटंकी राखी’ म्हणत तिची मजा घेतली.
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. राखीची नौटंकी पाहून राखी चांगलीच ट्रोल झालीय. हा व्हिडीओ वाऱ्यासारखा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बिग बॉस १४ या सीजननंतर राखी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. बिग बॉस १४ मधून बाहेर पडल्यानंतर राखी सावंत सतत या ना त्या कारणाने चर्चेत आहे