उन्नाव येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कारी केल्याप्रकरणी तसेच तिच्या वडिलांची हत्या केल्या प्रकरणी शिक्षा भोगत असलेला भाजपा आडमार कुलदीप याच्या पत्नीला दिलेली उमेदवारी जनतेच्या प्रचंड विरोधानंतर अखेर भाजपने रद्द केली आहे.
कुलदीप सेंगर याच्या पत्नी संगिता कुलदीप सेंगर हिला भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेश जिल्हा पंचायत निवडणुकीचे तिकीट दिले होते. फतेहपूर चौरासी वॉर्डातून त्यांना हे तिकीट देण्यात आले होते. या दिलेल्या तिकीटीनंतर भाजपवर चोहीबाजूने टीका करण्यात आली होती.
या होणाऱ्या टीकेनंतर अखेर आज भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी संगिता सेंगर यांची उमेदवारी रद्द करण्यात आल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले.
उत्तर प्रदेशमध्ये सध्या जिल्हा पंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत भाजपच बाजी मारणार आहे. उन्नावमधील फतेहपूर चौरासी वॉर्ड क्र. २२ मधून संगिता सेंगर यांना तिकीट देण्यात आले होते, मात्र आता ते रद्द करण्यात आले आहे अशी घोषणा त्यांनी केली आहे.