पुणे- राज्यात सध्या कोरोना विषाणू वाढल्याने सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या व्यक्तींना त्यांच्या नातेवाईकांपासून लांब ठेवले जातेय. त्यांना प्रशाशनाकडून पेशंटला भेटलायला सक्त मनाई करण्यात आली आहे. अशातच पुण्यात चक्क डॉक्टरांना चिठी लिहून धमकावण्यात आल्याचा प्रकार पुण्यातील जम्बो हॉस्पिटलमध्ये समोर आला आहे. ‘डॉक्टर….आम्हांला आमच्या पेशंटला भेटू दे. नुसते मोबाइलवर बोलून जमणार नाही. आम्हांला रोज एकदातरी ‘आयसीयू’मध्ये जाऊ दे. नाहीतर बघ तू..तुझी गाडी नंबर….’ असे या चिठ्ठीत लिहिले आहे.
पुण्यातील जम्बो रुग्णालयात एक व्यक्ती आयसीयूमध्ये उपचार घेत आहे. मात्र कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने रुग्णांना पेशंटला भेटण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे तेथील नातेवाईकांनी डॉक्टरांना चिठी लिहिली आहे, एवढेच नव्हे भेटू नाही दिले तर संबंधित डॉक्टरांना बरे वाईट करण्याची थेट धमकीच चिठ्ठीद्वारे दिली.
अशी मानसिकता जर बाधितांच्या नातेवाईकांची राहिली तर डॉक्टरांना उपचार करणे अवघड जाते. त्यातून असे नातेवाईक प्रक्षुब्ध झाले तर विपरित प्रकार घडतो, डॉक्टरांना मारहाणही होते. त्यामुळे जेथे नातेवाईकांना जाण्याला प्रतिबंध आहे तेथे जाण्यासाठी बळजबरी करू नये. यामुळे डॉक्टरांचेही खच्चीकरण होते, असे मत वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केले.