राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. आज ऑक्सिजनचा पुरवठा अभावी अनेकांना आपला प्राण गमवावा लागत आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रं लिहून हवाईमार्गे महाराष्ट्राला ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे.
त्यातच आता उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सतर्फे महाराष्ट्राला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार आहे. गुजरातमधील जामनगर येथून महाराष्ट्राला हा ऑक्सिजन पुरवठा केला जाणार असून यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. या संदर्भातील माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, रिलायन्सच्या जामनगर प्लँट मधून महाराष्ट्रासाठी १०० मेट्रिक टन अतिरिक्त ऑक्सिजन पुरवठा होणार. विभागीय आयुक्त, रायगड व ठाणे जिल्हाधिकारी आणि एफडीए आयुक्त यांची समन्वय समिती ऑक्सिजन पुरवठ्याबाबत समन्वयाचे काम करेलमी अशी माहिती त्यांनी ट्विटद्वारे दिली आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात राज्यात मुबलक प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा उपलब्ध होणार आहे.
एमएमआर क्षेत्रातील अनेक भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यासोबतच पेशंट्सना ऑक्सिजन पुरवण्यासाठी ऑक्सिजनची मागणी देखील प्रचंड वाढली आहे. मागणी व पुरवठा यातील तफावत दूर करण्यासाठी नक्की काय करता येईल, याचा आढावा घेण्यासाठी लिंडे कंपनीच्या ऑक्सिजन कंपनीला भेट देत pic.twitter.com/zzSHdyuqCf
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) April 13, 2021