केंद्र सरकारने लागू केलेल्या नवे कृषी विषयक कायदे रद्द करावेत यासाठी गेले अनेक दिवस शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत होते. आंदोलनाने तर आक्रमक रूप घेतले होते. मात्र काहीदिवसांपूर्वीपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने शेतकरी थंडावले होते परंतु दिल्लीच्या सीमा रेषांवर बसलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला शनिवारी १०० दिवस पूर्ण होत आहेत.
त्यामळे २६ जानेवारी रोजी झालेल्या प्रकारानंतर काहीसं थंडावलेलं शेतकरी आंदोलन शनिवारी म्हणजेच ६ मार्च रोजी पुन्हा जोर धरण्याची शक्यता आहे.
यानिमित्ताने शेतकरी आंदोलक दिल्लीकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या महामार्गावर रास्तारोको करणार असल्याचं वृत्त राऊटर्सने दिलं आहे. केंद्र सरकारने हे कायदे रद्द करावेत आणि नंतर चर्चा करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.