आज तक या वृत्तवाहिनीमध्ये वृत्त निवेदनाचं काम करणाऱ्या प्रसिद्ध वृत्तनिवेदक रोहित सरदाना यांचं शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने दु:खद निधन झालं. सुधीर चौधरी यांनी यासंबंधी ट्विट करत रोहित सरदाना यांच्या निधनाची बातमी समोर आणली होती. रोहित सरदाना यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आलं होतं मात्र याच दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.
सरदाना यांच्या निधनाचे वृत्त येताच पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून सर्वांनीच सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली होती. कोणाचेही निधन झाल्याची बातमी कळताच, प्रत्येकाच्या मनात हळहळ व्यक्त होतेच. पण रोहित सरदाना यांच्या मृत्यूनंतर नेहमीच वादात असलेल्या शरजील उस्मानीने पुन्हा एकदा वादग्रस्त ट्विट केले आहे. काही दिवसांपूर्वी एल्गार परिषदेत वादग्रस्त वक्तव्य करत उस्मानीने आपल्या अडचणी वाढवून घेताय होत्या.
देशातील प्रसिद्ध अशा वृत्त वाहिनीत रोहित सरदाना काम करत होते. देशातील अनेक नामवंत नेते मंडळींची मुलाखत त्यांनी घेतली होती. रोहित सरदाना यांच्या विषयी सोशल मीडियावर प्रतिक्रीया देताना शरजील म्हणतो की, ‘समाजविरोधी, मनोरुग्ण खोटारडा, नसंहाराचे समर्थन करणारा होता. तो पत्रकार म्हणून आठवणीत राहणार नाही. असे ट्विट शरजील उस्मानीने केले आहे. यावर आता संतप्त प्रतिक्रिया येण्यास सुरवात झालेली आहे.