मुंबई दि.१४-मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी सचिन वझे यांना एनआयएनकडून अटक करण्यात आली आहे.
शनिवारी रात्री उशिरा म्हणजेच ११ वाजून ५० मिनिटांनी एनआयएनने ही कारवाई केली आहे.त्याच्या राहत्या घरी पोहचत सचिन वझे यांना ताब्यात घेण्यात आलं.
शनिवारी त्यांनी व्हाट्सअप्पला ठेवलेल्या स्टेटसमुळे पोलीस दलात खळबळ माजली होती.यानंतर याच रात्री एनआयएन ही कारवाई केली.अटके आधी तब्बल १३ तास सचिन वझे यांची एनआयएनने कसून चौकशी केली होती.
यानंतर ही कारवाई करत सचिन वझे यांना एनआयएनने ताब्यात घेतले आहे.उद्या त्यांची हेल्थ चेकअप करण्यात येणार आहे.त्यानंतर पुढील कारवाई होणार आहे.सचिन वझे यांना अटक करण्यापूर्वी त्यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.त्यांना ११ वाजून ५० मिनिटांनी त्यांना अटक करण्यात आली.
या अटकवेळी पुढील कलम वाझेंवर लावण्यात आल्याचे बोलले जात आहे.
● भारतीय दंड संहिता कलम 286 :-
या कलमा अंतर्गत, जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणाने स्फोटकं बाळगणे, इतरांच्या जीवाला धोका होईल असं वर्तन करणे,अश्या वर्तवणुकीसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात येतो.
● भारतीय दंड संहिता कलम 465 :-
अश्या कलमा अंतर्गत, खोट्या किंवा बनावट गोष्टी करणे,अश्या वर्तवणुकीसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात येतो. या गुन्ह्यात तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते.
● भारतीय दंड संहिता कलम 473 :-
या कलमा अंतर्गत दिशाभूल करण्यासाठी केल्या जाणाऱ्या बनावट कृती, अश्या वर्तवणुकीसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात येतो.
● भारतीय दंड संहिता कलम 506(2):-
या कलमाअंतर्गत, दहशत निर्माण करणं किंवा धमकी देणे,अश्या वर्तवणुकी संदर्भात गुन्हा दाखल करण्यात येतो.
● भारतीय दंड संहिता कलम 120 B:-
या कलमा अंतर्गत, गुन्हेगारी स्वरुपाच्या षडयंत्रात सहभाग घेणे,अश्या स्वरूपाच्या वर्तवणुकीसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात येतो.
● स्फोटक पदार्थ कायदा 1908 कलम 4 अ, ब:-
या कलमाअंतर्गत स्फोटकं बाळगणे या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात येतो.
सध्या सचिन वझेंवर विविध आरोपांच्या फैरी झडत आहेत.त्यांना अटक करण्यात आल्याने एनआयएच्या हाती सबळ पुरावे लागल्याचे बोलले जात आहे.