झी मराठीवरील ‘काहे दिया परदेस’ या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारून घराघरात पोहोचलेल्या सायली संजीवचा हटके लूक नुकताच एका सोहळ्यात पाहायला मिळाला. कलर्स मराठी अवॉर्ड या सोहळ्यासाठी सायलीने खास लूक केला होता.
या सोहळ्यासाठी सायलीने गोल्डन वर्क असलेला स्कर्ट आणि ब्लाउज परिधान केल्याचं दिसून आलं. तर मोठे गोल्डन कानातले आणि तिने केलेली खास हेअर स्टाइल यामुळे सायलीचा लूक उठून दिसत होता.
मराठी सोबतच सायली ‘परफेक्ट पती’ या हिंदी मालिकेतही झळकली. तसेच ती अनेक सिनेमांमध्येही झळकली आहे. ‘पोलिस लाईन’, ‘आटपाडी नाईट्स’, ‘मन फकिरा’ या सिनेमांसोबतच तिने कलर्स मराठीवरील शुभमंगल ऑनलाईन या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. लवरच ती एका नव्या अंदाजाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.