पुणे – पुण्यात सलून व्यासायिक आक्रमक झालेत.वाघोली येथे सलून असोसिएशनची राज्यव्यापी महत्त्वपूर्ण बैठक झाली. सलून बंद करणार नाही, असहकार आंदोलन करणार, अशी भूमिका घेत सलून व्यावसायिक रस्त्यावर उतरले आहेत.
राज्य सरकारकडून सलून बंद ठेवण्याच्या निर्णयावर सलून व्यवसायिकांची प्रचंड नाराजी आहे. या बैठकीत सलून व पार्लर व्यवसायिकांनी मोठा निर्णय घेतला असून सलून चालू ठेऊन महिलांना दुकानाबाहेर बसून सलून चालू ठेवणार आहोत,असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. आता त्यांनी पुण्यातील मुख्य चौकात एकत्र येत रस्ता रोको सुरू केला आहे.