कोरोना काळात अनेक लोक आपल्याला जमेल त्या पद्धतीने नागरिकांना मदत करत आहेत, गोरगरिबांच्या सेवेसाठी अभिनेते, क्रिकेटर मदतीसाठी धावून आले आहेत मात्र गरिबांच्या सेवेसाठी सर्वसामान्य माणूसदेखील मागे राहिलेला नाही. कोरोना विषाणू आल्यापासून अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या तसेच व्यवसाय बंद झाले. अशा स्थिती मध्यप्रदेशातील भोपाळच्या रिक्षावाल्यानं सगळ्यांसाठीच आदर्श घालून दिला आहे.
MP: An auto driver in Bhopal has converted his auto into an ambulance & takes patients to hospitals for free. Javed, the driver, says, "I saw on social media & news channels how people were being carried to hospitals due to the shortage of ambulance. So I thought of doing this." pic.twitter.com/eaH4CpWGBO
— ANI (@ANI) April 30, 2021
एएनआयशी बोलताना त्यांनी सांगितले की, ”मी सोशल मीडियावर आणि वृत्तवाहिन्यांवर पाहिलं की, रुग्णवाहिकांच्या कमतरतेमुळे लोकांवर वाईट प्रसंग ओढावत आहेत. कसंबसं प्रयत्न करून लोकांना रुग्णालयापर्यंत पोहोचवलं जात आहे. म्हणून मी लोकांची मदत करण्याचा विचार केला. त्यासाठी मी माझ्या पत्नीचे दागिने विकले. ऑक्सिजनसाठी मी रिफिल सेंटरच्या बाहेर उभा राहतो. गेल्या १५ ते २० दिवसांपासून मी हे काम करत आहे. ”माझा संपर्क क्रमांक सोशल मीडियावर देण्यात आला आहे. जर एखाद्याला रुग्णवाहिला मिळाली नाही तर ते मला फोन करू शकतात. यादरम्यान ९ गंभीर स्थितीतील रुग्णांना मी रुग्णालयात पोहोचवलं आहे. सोशल मीडियावर लोकांनी या रिक्षाचालकावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
खरंतर एका बाजूला कोरोनाचा धोका वाढतोय तर दुसरीकडे कोणतीही परिस्थिती आली तरी माणसातील माणुसकी जागी होत आहे. एकीकडे अर्जुन गौडा सारखा अभिनेता स्वतः कोरोना रुग्णांसाठी अॅम्बुलन्स ड्रायव्हर झालाय तर दुसरीकडे भोपाळच्या रिक्षावाल्यानं सर्वांच्या मनात घर बनवल आहे.