शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या धोरणावर बोट ठेवत केंद्र सरकारवर टीका केली आहे. आज आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत देशाचे जे चित्रं ज्या पद्धतीने निर्माण केले जात आहे. त्यावरून हे फार मोठं षडयंत्र असू शकतं. भारताची अर्थव्यवस्था नष्ट करण्याचं हे मोठं षडयंत्र असू शकतं, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. ते आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.
आज नाना प्रकारे राष्ट्रीय स्तरावर भारताचा अपमान होत असेल तर त्यात राजकारण करण्याची गरज नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा अपमान होत असेल तर सर्वांनी मतभेद विसरून आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. मोदी जे धोरण बनवतील त्याच्यामागे उभं राहिलं पाहिजे, असं राऊत यांनी बोलून दाखविले. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशातील कोणत्याही व्यक्तीचा किंवा देशाचा अपमान होत असेल तर तो योग्य नाही.
विदेशी सोशल मीडिया, विदेशी मीडियात भारताचे चित्रं ज्या पद्धतीने चित्र निर्माण केलं जात आहे. त्यातून भारताचे सामाजिक स्वास्थ आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. त्यामुळे भारताला बदनाम करण्याचं हे षडयंत्र असू शकतं. भारताची अर्थव्यवस्था नष्ट करण्याचं हे षडयंत्रं असू शकतं. त्याविरोधात आपण सर्वांनी एकत्रं येऊन लढलं पाहिजे, असं मतही त्यांनी व्यक्त करत पंत्रप्रधान नरेंद्र मोदिंच्या मागे ठाम उभे राहिले पाहिजे असे विधान त्यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवलं होत.