मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआय’ने गुन्हा नोंद केला आहे. तसेच सीबीआय’ने त्यांच्या मुंबई आणि नागपूर येथील घरी आणि कार्यालयावर सुद्धा छापे मारले आहेत. परमबीर सिंह यांनी देशमुखांवर १०० कोटी हप्ता वसुलीचा आरोप लगावल्यानंतर त्यांच्या अडचणीत अधिक वाढ झालेली दिसून आली होती. याच पाश्वभूमीवर आता खासदार संजय राऊत यांनी सूचक ट्विट केले आहे
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, कुछ तो गडबड है… मा.उच्च न्यायालयाने फक्त प्राथमिक चौकशीचे आदेश देत अहवाल सादर करा असे सीबीआयला सांगीतले होते. अनिल देशमुखावर धाडी. एफ.आय. आर..वगैरे अतिरेक आहे. हा सर्व प्रकार न्याय व तर्कसंगत दिसत नाही.दया..कुछ तो गडबड जरूर है असे ट्विट करून केंद्र सरकारच्या चौकशीवर संशय व्यक्त केला आहे.
अनिल देशमुख यांनी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना १०० कोटी रुपये गोळा करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा आरोप करून परमबीर सिंग यांनी खळबळ उडवून दिली होती. त्यात अनिल देशमुख यांच्या निवासस्थानांवर आज सकाळपासून सुरू झालेले धाडसत्र अद्याप सुरू आहे. तसेच सीबीयाचे अधिकारी PPE किट घालून त्यांच्या घराबाहेर हजर आहेत. त्यामुळे अनिल देशमुखांना केव्हाही अटक होऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.
कुछ तो गडबड है…
मा.उच्च न्यायालयाने फक्त प्राथमिक चौकशीचे आदेश देत अहवाल सादर करा असे सीबीआयला सांगीतले होते.
अनिल देशमुखावर धाडी. एफ.आय. आर..वगैरे अतिरेक आहे. हा सर्व प्रकार न्याय व तर्कसंगत दिसत नाही.दया..कुछ तो गडबड जरूर है.— Sanjay Raut (@rautsanjay61) April 24, 2021