मिलाप झवेरी दिग्दर्शित बॉलिवूड अभिनेता जोर्न अब्राहम याचा सत्यमेव जयते या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित होण्याची तारीख आता पुढे ढकलण्यात आली आहे.
वाढत्या कोरोना संक्रमणामुळे परिस्थिती चिंताजनक होत असून प्रेक्षकांच्या आरोग्याची आम्हास काळजी आहे.
त्यांच्या सुरक्षिततेला पहिले प्राधान्य द्यायला हवे.त्यामुळे आम्ही प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलत आहोत.अश्या आशयाचे निवेदन चित्रपट निर्मात्यांनी दिले आहे.
दरम्यान चित्रपट प्रदर्शनाची पुढची तारीखेविषयी अद्याप अधिकृत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
चित्रपटाची तारीख पुढे ढकलली नसती तर सलमान खानचा राधेय आणि जोर्न चा सत्यमेव जयते 2 एकाच वेळी प्रदर्शित झाले असते, त्यामुळे बॉलिवूडप्रेमींसाठी ही जुगलबंदी पाहणं मनोरंजनाची पर्वणी ठरली असती.
मिलाप झवेरी दिग्दर्शित सत्यमेव जयते या चित्रपटाच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता.
सत्यमेव जयतेच्या दुसऱ्या भागाच्या प्रेक्षकवर्ग प्रतीक्षेत असून हा पहिल्या भागाचा सिक्वेल असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.