• Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • इतर
Shivbandhan News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • इतर
No Result
View All Result
Shivbandhan News
No Result
View All Result

शिवपुण्यतिथीदिनी राजधानी रायगडावर शिवरायांच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक घोषित

केवळ ५ शिवभक्त धारकरी रायगडवरुन पंढरीस जाणार आहेत

प्रतिनिधी:- मयुरी कदम by प्रतिनिधी:- मयुरी कदम
April 29, 2021
in इतर, ताज्या बातम्या
0
शिवपुण्यतिथीदिनी राजधानी रायगडावर शिवरायांच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक घोषित

पुणे – हिंदवी स्वराज्याची तिसरी राजधानी दुर्गदुर्गेश्वर रायगडाहून भूवैकुंठ पंढरीतील विठोबाच्या भेटीस दरवर्षी जाणाऱ्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पालखीचे प्रस्थान नित्य प्रथेप्रमाणे ज्येष्ठ वद्य चतुर्थी, श्री राजाभिषेक शक ३४८, तद्नुसार यावर्षी सोमवार, दिनांक २८ जून २०२१ रोजी सकाळी ठीक ९ वाजता रायगडावरील छत्रपती श्री शिवाजी महाराज समाधी मेघडंबरी पासून होणार आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेल्या विपरीत परिस्थितीमुळे शिवरायांच्या पादुका चक्क डोक्यावर घेऊनच केवळ ५ शिवभक्त धारकरी रायगडवरुन पंढरीस जाणार आहेत. गेल्यावर्षीही कोरोनाच्या प्रकोपामुळे रायगडावरुन केवळ ३च श्रद्धाळू शिवभक्त शिवरायांच्या पादुकांना घेऊन पंढरपूरला गेले होते. विनाकारण निर्माण केलेला कोरोनाचा भयकंप न बाळगता संपूर्णपणे सावधगिरी बाळगून, प्रलयंकारी महामारीतही धारकऱ्यांसह पालखी मार्गातील समाजस्वास्थ्याची अत्यावश्यक काळजी घेऊन, अजिबातच गर्दी न जमवता, मार्गातील अनावश्यक कोणासही पादुकांच्या प्रवासाची बित्तंबातमीही न लागता, पायी पालखी सोहळ्याची परंपरा अगदीच सुरक्षितपणे जपता येऊ शकतेच; याचा सर्वोत्तम आदर्श शिवरायांच्या याच पालखी सोहळ्याने गेल्या वर्षी घालून दिला होता.

जगदीश्वराचे व शिर्काईचे दर्शन घेऊन राजसदर, रायगडाहून प्रस्थान केल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या पादुकांचा पहिला विसावा पाचाड मधील जिजाऊ मांसाहेबांच्या समाधी छत्री जवळ असेल. आऊसाहेबांचा आशीर्वाद व निरोप घेऊन सोहळा पहिल्या मुक्कामी पळसगाव खुर्द मधील मारुती मंदिरात येईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा मुक्काम श्रीरामपूरमध्ये करुन सोहळा तिसऱ्या दिवशीच्या मुक्कामास, दि. ३० जून २०२१ रोजी ऐतिहासिक ताम्हिणी घाटातील जुन्या पाऊलवाटेने पुणे जिल्ह्याच्या सीमेवर मुळशी तालुक्यातील आदरवाडी गावात येईल. तेथून मजलदरमजल करत शिवाजी महाराज ज्येष्ठ शुद्ध दशमी, दि. ४ जुलैला तुकोबारायांच्या पालखी मार्गावर सामील होण्यासाठी पुण्यनगरीत दाखल होतील. भागवतधर्माचे संवाहक संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या वारीचे जनक जगद्गुरु तुकाराम महाराज* व हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या शक्तिधारा-भक्तिसागर भेटीचा उत्सव एकादशीच्या सूमुहूर्तावर हडपसरला ५ जुलैला पार पडून मग पालखी सोलापूर महामार्गाने चौफुला, दौंड, माळेगाव, बारामती, इंदापूर, अकलूज, तोंडले-बोंडले, भाळवणी मार्गे आषाढ शुद्ध दशमी, दिनांक १९ जुलैला पांडुरंगाच्या दर्शन ओढीने पंढरपुरात मुक्कामी पोहचेल. आषाढी एकादशीला चंद्रभागास्नान व नगरप्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर आषाढी वारीतील शिवबा-विठोबा भेटीचा सोहळा श्रीविठ्ठल मंदिरात पार पडेल. गुरुपौर्णिमेस नियोजित राष्ट्रसमर्पण अभिवादन असल्याने शिवरायांच्या पादुकांचा परतीचा प्रवास द्वादशीलाच वाहनाने होऊन केवळ तीनच मुक्कामात पालखी २३ जुलैला पुन्हा रायगडी दाखल होईल.

जागतिक महामारी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळ्याच्या आयोजनात सहभागी होणाऱ्या विविध ग्रामप्रमुखांकडून मागील वर्षासारख्याच याही वर्षी सूचना मागविल्या गेल्या होत्या. त्या सर्व सूचना व भविष्यात लागू होऊ शकणारे शासनाचे संभाव्य प्रतिबंधात्मक निर्देश लक्षात घेता पालखी मार्गावरील ५३ शाळांमध्ये होणारे भक्ति-शक्ति समन्वय जागरण रिंगण सोहळे यावर्षीही होणार नाहीत. त्याऐवजी गेल्या ५ वर्षातील विविध रिंगणांची संकलित चित्रे, ‘वर्तमानातील शिवभारत’ अंतर्गत विविध व्याख्यानांचा ध्वनीमुद्रिका संच आणि एक पालखी विशेषांक संबंधित शाळांना देण्यात येतील. शिवरायांच्या पालखी समन्वयकांकडे कोरोना पार्श्वभूमीवर आयोजिलेला गतवर्षीचा रायगड ते पंढरपूर असा पायी चालण्याचा अनुभव गाठीशी आहेच. त्यामुळे वर्तमान परिस्थितीत समाजस्वास्थ्यास अत्यावश्यक ते शारीरिक आरोग्य अंतर कायम राखून, विसाव्याच्या गावाबाहेरच मुक्काम करुन, सुनिश्चित पालखी मार्गातील कोणत्याही गावात अजिबातच न मिसळता केवळ ५च शिवभक्त रायगड ते पंढरपूर असा पायी प्रवास याही वर्षी करतील.

शिवरायांच्या पालखी सोहळ्याच्या नित्योपचाराच्या प्रथा व परंपरा कायम राखताना पालखी, दिखाव्याचा डामडोल, सोहळ्यातील व्यवस्थेची वाहने आदी सारे यंदाही टाळले जाणार आहे. सकाळच्या प्रस्थानाची पूजा व शिववंदना, सायंकाळच्या विसाव्याची आरती व हरिपाठ सोडून बाकी सारे उपचार गेल्या वर्षाप्रमाणे यावर्षीही होणार नाहीत. रायगड ते पंढरपूर असा पूर्ण प्रवास शिवरायांच्या पादुकांना डोक्यावर घेऊनच यंदाही पालखी सोहळा संपन्न होणार आहे. पादुकांचे दर्शन त्या त्या गावातील शिवभक्तांना सामाजिक प्रचार-प्रसार माध्यमातून करवले जाणार असल्याने श्रींच्या पादुका दर्शनास कसलीही गर्दी न करण्याचे आवाहन सोहळा व्यवस्थापन समितीकडून केले गेले आहे.

Tags: Latest Newsmarathi newsPalkhi ceremonyraigadShiv bandhan newsShiv PunyatithiShivarayshivbandhanताज्या बातम्यामराठी बातम्यारायगडशिवपुण्यतिथीशिवबंधनशिवबंधन बातम्या
Previous Post

खड्डय़ाचे फोटो पाठवा २४ तासात खड्डा मुंबई मनपा बुजवणार !

Next Post

कठोर भूमिका आणि अंमलबजावणीशिवाय कोरोना नियंत्रणात येणार नाही – दादाजी भुसे

Next Post
महाबीज’ला बियाण्यांच्या किंमती न वाढवण्याचे कृषिमंत्री दादा भूसे यांचे निर्देश

कठोर भूमिका आणि अंमलबजावणीशिवाय कोरोना नियंत्रणात येणार नाही - दादाजी भुसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

९० टक्के मुंबईकरांना माहित नसलेलं धार्मिक ठिकाण..वाघोलीतील शनि मंदिर

९० टक्के मुंबईकरांना माहित नसलेलं धार्मिक ठिकाण..वाघोलीतील शनि मंदिर

February 5, 2023
पुणतांबा येथे वंदनीय दैवत हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिमेचे भक्तीमय वातावरणात पुजन

पुणतांबा येथे वंदनीय दैवत हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिमेचे भक्तीमय वातावरणात पुजन

January 25, 2023
राष्ट्रीय पुरूष वंदनीय दैवत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त पुणतांबा येथे सर्व रोग निदान मोफत शिबिराचे आयोजन

राष्ट्रीय पुरूष वंदनीय दैवत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त पुणतांबा येथे सर्व रोग निदान मोफत शिबिराचे आयोजन

January 21, 2023
प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल विलेपार्लेच्या जिमनॅस्टपटूंचा महाराष्ट्र संघाला ज्युनिअर राष्ट्रीय चॅम्पियनशिप मिळून देण्याचा पराक्रम.

प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल विलेपार्लेच्या जिमनॅस्टपटूंचा महाराष्ट्र संघाला ज्युनिअर राष्ट्रीय चॅम्पियनशिप मिळून देण्याचा पराक्रम.

January 10, 2023
राजापूर-लांजातील नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच व सदस्यांचा शिवसेना उपनेते आमदार डॉ राजन साळवी यांचे अध्यक्षतेखाली सत्कार

राजापूर-लांजातील नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच व सदस्यांचा शिवसेना उपनेते आमदार डॉ राजन साळवी यांचे अध्यक्षतेखाली सत्कार

January 6, 2023
आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुढे आहे, याचं संपुर्ण क्रेडिट सावित्रीमाईंचं आहे, वाचा महत्त्वपूर्ण माहिती..

आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुढे आहे, याचं संपुर्ण क्रेडिट सावित्रीमाईंचं आहे, वाचा महत्त्वपूर्ण माहिती..

January 3, 2023
छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नव्हते म्हणणाऱ्या अजित पवारांचा संभाजीराजांनी घेतला संतप्त शब्दात समाचार,म्हणाले…

छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नव्हते म्हणणाऱ्या अजित पवारांचा संभाजीराजांनी घेतला संतप्त शब्दात समाचार,म्हणाले…

January 2, 2023
अजित पवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा अजिंक्यतारा किल्ल्यावरुन कडेलोट; छत्रपती संभाजीराजेंबद्दलच्या वक्तव्यावरून भाजप युवा मोर्चा आक्रमक

अजित पवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा अजिंक्यतारा किल्ल्यावरुन कडेलोट; छत्रपती संभाजीराजेंबद्दलच्या वक्तव्यावरून भाजप युवा मोर्चा आक्रमक

January 2, 2023
दोन दिवसाच्या मुलाला निर्दयी बापाने फरशीवर आपटलं! बाळ गंभीर जखमी

दोन दिवसाच्या मुलाला निर्दयी बापाने फरशीवर आपटलं! बाळ गंभीर जखमी

January 2, 2023
लग्नाळूंसाठी २०२३ वर्ष ठरणार सुगीचं! तब्बल ८ महिने वाजणार सनई चौघडे

लग्नाळूंसाठी २०२३ वर्ष ठरणार सुगीचं! तब्बल ८ महिने वाजणार सनई चौघडे

January 2, 2023
  • Home

© 2021 Website Managed by Bluesquareinfotech.in 9136039884 I 9987368026

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • इतर

© 2021 Website Managed by Bluesquareinfotech.in 9136039884 I 9987368026

या वेबसाईटचा सर्व मालकी हक्क संपादक पोपटराव जाधव यांच्याकडे असल्याने आपण या वेबसाईटवरील कोणता ही कंटेंट कॉपी करू शकत नाही. बातमी आवडल्यास बातमी शेअर करा.
WhatsApp Group