राज्यातील सरकारी शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठी घोषणा केली आहे. शासकीय शाळांच्या गुणवत्तेत सुधारणा आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून ५०० आदर्श शाळा स्थापित करणे हे त्या दिशेने टाकलेले पाऊल आहे.
‘विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडेल,यासाठी शाळांत नियमित शिक्षणाव्यतिरिक्त मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक विकास होईल असे शिक्षण दिले जाईल’. अशी घोषणा वर्षा गायकवाड यांनी ट्वीटच्या माध्यमातून केली आहे. ‘सदर आदर्श शाळांमध्ये उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा, आदर्श शिक्षक-विद्यार्थी संख्येनुसार सोयीसुविधाचा वापर, निकाल आणि परिणामांवर भर दिला जाईल’, असंही गायकवाड यांनी म्हटलंय.
करोनाच्या काळात अॅानलाईन शिक्षणाचा पर्याय जरी असला तरी मुलांचं शैक्षणिक दृष्ट्या मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे असं वर्ष गायकवाड म्हणाल्या.