काही दिवसांपूर्वी उद्योगपती मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ जिलेटिनच्या स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडली होती. या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली होती. याच संदर्भात नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे. जी स्कॉर्पिओ अंबानींच्या घराबाहेर सापडली होती, त्या गाडी मालकाचा मृतदेह सापडला आहे. मनसुख हिरेन असं मृत व्यक्तीचं नाव असून यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर भागात सापडला आहे.
गाडीचा शोध लागल्यानंतर मनसुख हिरेन हे मुंबई पोलीसांसमोर हजरही झाले होते. गाडी चोरीला गेल्याचं त्यावेळेस त्यांनी पत्रकारांना सांगितलं होतं. क्राईम ब्रँचनं त्यांची चौकशी केली होती. परंतु त्याचा मृतदेह आढळ्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
यावर आता विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणाचा तपास एनआयकडे द्यावा अशी मागणी केली आहे.