दिग्दर्शक, निर्माता करण जोहर यानी काही हटके करण्याच्या नादात अगदी रणवीर सिंगलाही टक्कर देतो. साहजिकच, रणवीर ट्रोल होतो तसाच करण जोहरही ट्रोल होतो. आता हेच पाहा ना, करणने असा काही शर्ट घातला की, सोशल मीडियावर तो जबरदस्त ट्रोल झाला आहे.
त्याने ब्लॅक अॅण्ड व्हाईटसारखा शर्ट घातला होता आणि त्याच्या या शर्टवर न्यूजपेपर प्रिंट होते. त्याचे या शर्टमधील फोटो व व्हिडीओ समोर आले आणि नेटक-यांची खिल्ली उडवण्यास सुरूवात झाली.
अगदी न्यूजपेपर दिसतोय, असे एका युजरने करणचा फोटो पाहून लिहिले. अन्य एकाने तर करणची चांगलीच मजा घेतली. कोई करण को समझाए की इसे पढना होता है, पहनना नहीं, असे या युजरने लिहिले. एका युजरने त्याला ‘चलता फिरता अखबार’ म्हणत त्याची खिल्ली उडवली.