भाजपाच्या खासदार आणि अभिनेत्री किरण खेर यांना ब्लड कॅन्सर झाल्याची माहिती समोर आली आहे. तरी सध्या त्यांच्यावर सध्या मुंबईमधील एका रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे वृत्त आहे. किरण खेर याना ब्लड कॅन्सर झाल्याची माहिती यांचे पती व प्रसिद्ध अभिनेता अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर दिली आहे.
???? pic.twitter.com/3C0dcWwch4
— Anupam Kher (@AnupamPKher) April 1, 2021
माझी पत्नी किरण खेर यांना ब्लड कॅन्सर झाला आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. ती एक फायटर आहे आणि ती या आजारावर लवकर मात करेल. तिची प्रकृती स्थिर आहे. किरण लवकर बरी व्हावी म्हणून प्रार्थना करा’ असे अनुपम यांनी म्हटले आहे. किरण खेर लवकर बऱ्या व्हाव्यात म्हणून चाहत्यांनी कमेंट करूनदेवाकडे प्रार्थना केली आहे.
Praying for Kirron's speedy recovery ????❤️Pls convey my love to her. https://t.co/Gqs9LSkD2E
— Madhuri Dixit Nene (@MadhuriDixit) April 1, 2021
‘किरण लवकरात लवकर बऱ्या होऊ देत अशी मी देवाकडे प्रार्थना करते’ या आशयाचे ट्वीट अभिनेत्री माधुरी दीक्षितनेही केले आहे.