कोरोनाने संपूर्ण जग हादरून गेलय. रात्रंदिवस लोकांच्या मनात कोरोना भीती निर्माण झालीय अशातच कोरोना वॅक्सीन आल्याने लोकांना थोडा का होईना पण दिलासा मिळाला आहे. सर्वच भागात लसीकरणाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अशातच ब्राझिलमधील सेक्स वर्करने कोरोना लशीसाठी आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. लसीच्या प्राधान्य सूचीत त्यांनाही स्थान मिळावं यासाठी त्यांनी हे आंदोलन केले आहे.
कोरोना लसीकरण सुरु झाला मात्र लस कोणकोणत्या गटाने घ्यावी हे जाहीर झालं. त्यात ज्याप्रमाणे भारतात प्रथम कोरोनाशी झुंझ करतायत ते कोरोना योद्धे व त्यानंतर ४० वर्षावरील लोकांना कोरोना लस देण्यात आली त्याचप्रमाणे ब्राझिलमध्येही प्राधान्य यादी जाहीर केली गेली. मात्र त्यात सेक्स वर्करला प्राधान्य नसल्याने होरिजोंटे शहरातील सेक्स वर्कर्सने आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे.
सरकारने आधीच मेडिकल कर्मचारी, शिक्षक, कोरोना योद्धा, सिनियर सिटिझन यांना या यादीत स्थान दिले आहे. ‘आम्ही दररोज वेगवगेळ्या लोकांना भेटतो. त्यांच्याशी आमचा खूप जवळचा संबंध येतो. त्यामुळे आम्हाला लशीची खूप जास्त गरज आहे. आता यात आम्हालाही सामिल करावे व लवकरात लवकर आम्हाला लस द्यावी’, असे या सेक्स वर्कर्सचे म्हणने आहे.