पंढरपूर : राष्ट्रवादीचे नेते आणि पंढरपूरचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधानसभेच्या पोट निवडणुक जागेसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नावाची घोषणा केली आहे. अखेर भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे.
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून कुणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचं लक्ष्य लागले होते या पोट निवडणुकीसाठी अनेकांची नावे पुढे आली होती. अखेर राष्ट्रवादीकडून भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भगीरथ भालके हे उद्या मंगळवारी आपला उमदेवारी अर्ज दाखल करणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भारत भालके यांचे २७ नोव्हेंबर २०२० रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची जागा रिक्त झाली. दिवंगत आमदार भारत भालके यांच्या जागेवर त्यांचे पुत्र भगीरथ भालके किंवा त्यांच्या पत्नी जयश्री भालके यांना राष्ट्रवादीवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. अखेर मुलाच्या नावावर राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.