मुंबई – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर गॉल ब्लॅडरवर सोमवारी सर्जरी होणार आहे. त्याबाबत अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे.
Our party President Sharad Pawar saheb has been admitted in Breach Candy Hospital and as informed earlier, a surgery will be performed tomorrow to address his Gall Bladder ailment.
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) April 11, 2021
काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात पहिली शस्त्रक्रिया करण्यात आली होती व ती यशस्वी झाली होती. त्यानंतर त्यांना घरी विश्रांतीसाठी पाठवण्यात आले होते. व आज त्यांना पुढील शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.