दरवर्षी आयपीएलचे सामने हे दमदार व धडाकेबाज होत असतात. त्यात दरवर्षी ऑरेंज कॅप व निळी कॅप अशा दोन कॅप उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज यांना देण्यात येतात. मात्र यंदाचा ऑरेंज कॅप असणाऱ्या धवनने सलामी फलंदाज म्हणून ५००० धावांचा टप्पा ओलांडला आहे. आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज आहे. १६०व्या डावात धवनने ही कामगिरी केली.
त्यामुळे मागील काही दिवसांपासून त्याचे खूप कौतुक होत आहे. धवन आतापर्यंत आयपीएलमध्ये मुंबई, हैदराबाद, डेक्कन चार्जर्स आणि दिल्ली कॅपिटल्स अशा चार संघांकडून खेळला आहे. मात्र आता तो दिल्ली कॅपिटल्स या संघामध्ये खेळत असून यंदाचा ऑरेंज कॅप तो मानकरी आहे. तसेच हैदराबादचा डेव्हिड वॉर्नर या विक्रमात दुसऱ्या स्थानी आहे. तर तिसऱ्या स्थानी पंजाबचा फलंदाज ख्रिस गेल आहे.