आदर्श गाव कारेगाव येथे मोठ्या उत्साहात शिवजयंती महोत्सव साजरा

कारेश्वर युवा प्रतिष्ठान तर्फे गावामध्ये विविध कार्यक्रमांनचे आयोजन


आदर्श गाव -कारेगाव (पारनेर ):-कारेश्वर युवा प्रतिष्ठाण या मंडळाने सालाबादप्रमाणे याही वर्षी १८ फेब्रुवारी ते १९, २०२४ रोजी शिवजयंती उत्सव सोहळ्याची जोरदार तयारी करण्यात आली होती

पारनेर तालुक्यातील आदर्श गाव कारेगाव या छोट्याशा गावमध्ये मंडळाचे अध्यक्ष श्री ज्ञानदेव सिताराम घुले आणि सर्व कार्यकर्त्यांनी मिळून मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलेला आहे १९ फेब्रुवारी २०१७ साली सर्व शिवभक्ताच्या वतीने महाराजांच्या पुतळ्याची स्थापना केले गेली होती.मोठ्या जल्लोषात हा कार्यक्रम दरवर्षी मोठया आनंदमय वातावरणात साजरा करण्यात येतो कारेश्वर महाराजांचा अखंड हरीनाम सप्ताह चालू असताना सुद्धा या मंडळाने याही वर्षी मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजरा करण्याचे ठरवले आणि शनिवार दि १८/०२/२०२४रोजी रात्री १० ला सर्व शिवभक्त शिवनेरी गडावर शिवज्योत पेटवण्यासाठी गेले होते ती शिवज्योत शिवनेरी वरून आदर्शगाव कारेगाव ८० किलोमीटर धावत सर्व मावळ्यांनी शिवज्योत आणली.

१९ फेब्रुवारी २०२४ रोजी गावात शिवज्योतीचे पूजन करून ग्रामप्रदक्षिणा केली शिवजयंती उत्सवात कारेश्वर युवा प्रतिष्ठान चे शिवभक्त विद्यमान श्री संतोष. नारायण घुले यांनी सर्व शिवभक्तांना टी शर्ट चे नियोजन केले होते आणि सायं ०४ ते ०७ शिवजयंती निमित्त शिव मूर्तीची मिरवणूक मारगवस्ती ते आदर्श गाव कारेगावं वाजत गाजत उत्साहात पार पडली आणि नंतर ७:३०ते ९:०० वाजता गावातील शिवभक्त श्री रेवजी सखाराम घुले यांच्या कडून मोफत शिव व्याख्यान ठेवण्यात आले होते ह.भ. प. आकाश महाराज फुले याचे शिव व्यख्यान झाले त्यानंतर शिवभक्त श्री अविनाश बबनशेठ खरात यांनी गावातील. वयस्कर मंडळीना अर्थो स्टिक काठी वाटप करण्याचे सौजन्य दिले आणि श्री कैलास शेठ खरात आणि श्री संतोष शेठ किसन बोरुडे याच्या वतीने शालेय साहित्य ०९:०० वाजता गावातील जिल्हापरिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप करण्यात आले हा उपक्रम मंडळ दरवर्षी करते तसेच रात्री ०९ :३० वाजता
थोर देणगीदार श्री कारेश्वर युवा प्रतिष्ठान चे सदस्य श्री शिवाजी बाबाजी घुले आणि श्री शैलेश भाऊसाहेब खरात यांच्यातर्फे महाप्रसादाचे अन्नदान करण्यात आले.

थोर सौजन्य दार याचा कारेश्वर युवा प्रतिष्ठान तर्फे त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला सर्व कार्यकर्त्यांनी मोठा हातभार लावला मंडळाचे अध्यक्ष श्री ज्ञानदेव सिताराम घुले सचिव श्री ज्ञानेश्वर प्रभाकर घुले मंडळाचे दक्ष खजिनदार रविंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडला आणि सर्व देगीदारांनी आपली देणगी जमा केली त्याचे मंडळच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले

सदर उत्सव सोहळ्याचे सूत्र संचालन श्री संदिप बन्सी घुले आणि संपत ठुबे आणि काशिनाथ घुले यांनी केले सदर वृत्तांत अक्षय खरात यांनी दिले. अध्यक्षानी सर्व देणगीदार आणि पदाधिकारी कार्यकर्ते यांचे आभार मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *