नाशिक- नाशिक शिवसेनेच्या सिडको येथील प्रभाग क्रमांक २४च्या नगरसेविका कल्पना चंद्रकांत पांडे यांचं अल्पशा आजाराने मृत्यू झाला आहे. वयाच्या ५०व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. रविवारी सकाळी त्यांनी जगाचा निरोप घेतला घेतला. कल्पना यांच्या घरी पती, एक मुलगा, एक मुलगी असा छोटासा परिवार आहे.
गेल्या पंधरा वर्षांपासून त्या आपल्या प्रभागाचं नेतृत्व करत होत्या. नागरिकांसाठी झटणाऱ्या नगरसेविका म्हणून त्यांना ओळखलं जात होत, तसेच त्यांनी नागरिकांच्या अनेक समस्या दूर केल्या आहेत. पूर्वी त्यांचे पती चंद्रकांत पांडे यांनीही नगरसेवक पद भूषवले आहे. त्यांच्या अचानक मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.