कोल्हापूर : राज्यात शिवसेना पक्षाने भारतीय जनता पक्षाला दूर सारून राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाबरोबर युती करून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले होते. या सत्तास्थापनेनंतर भाजपा तसेच त्यांच्या मित्र पक्षातील अनेकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता.
आता त्या पाठोपाठ आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाला शिवसेनेने जोरदार धक्का दिला आहे. आमदार विनय कोरे हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. त्यामुळे हा कोरे यांच्याबरोबर भाजपा पक्षाला सुद्धा मोठा धक्का आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा नगरपरिषदेतील माजी उपनगराध्यक्षा व जनसुराज्य पक्षाच्या विद्यमान नगरसेविका यास्मिन मुजावर, माजी नगरसेवक अख्तर मुल्ला, माजी नगरसेवक उमर फारुक मुजावर यांनी काल वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
हा पक्षप्रवेश जनसुराज्य पक्षासाठी मोठा धक्का मनाला जात आहे. या सर्वांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून पक्षात प्रदेश केला आहे. या पक्षप्रवेशावेळी शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे वर्षा बंगल्यावर हजर होते.