राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या राज्य सरकार तसेच स्थानिक प्रशासनाच्या अडचणी वाढवताना दिसत आहे, त्यात सर्व सामान्य नागरिकांबरोबर अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
त्यातच आता शिवसेना नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
या संदर्भातील माहिती त्यांनी स्वतः ट्विट करून दिलेली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, मला काही लक्षणे जाणवू लागली असल्याने मी आज कोरोना चाचणी केली होती. त्यात मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. मुंबई येथील निवासस्थानी मी डाॅक्टरांच्या सल्याने विलगिकरणात उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यानी आपली चाचणी करून घ्यावी. असे ट्विट त्यांनी केले आहे.
मागच्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यात मंत्री आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी सौ. रश्मी उद्धव ठाकरे यांना सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त कधी दिवसांपूर्वी समोर आले होते.