मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या राज्य सरकारच्या अडचणी वाढवताना दिसत आहे. त्यात सर्व सामान्य नागरिकांबरोबर राजकीय पुढाऱ्यांना सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर येत आहे.
आता त्या पाठोपाठ शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर येत आहे. रामदास कदम यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कदम यांनी काही दिवसांपूर्वीच कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली होती. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून कोणताही संशय मनात न ठेवता सर्वांनी लस घ्यावी असे आवाहनही त्यांनी ट्विट करून केले होते.
रामदास कदम यांनी काही दिवसांपूर्वीच करोना लस टोचून घेतली होती. त्यावेळी त्यांनी जनतेला करोना लशीबाबत असलेले गैरसमज दूर करण्याचे आवाहन केले होते.
लसीकरणानंतरही मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे व सतत हात धुवणे या कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन सर्वांनी करावे. 2/2
— Ramdas Kadam – रामदास कदम (@iramdaskadam) March 22, 2021